मोनानं पहिल्यांदाच सांगितलं बोनी कपूरसोबत असलेल्या नात्याचं ‘वास्तव’, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई आणि वान्टेड सारखे सुपरहिट चित्रपट बनवणारे बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूरचा काल जन्मदिवस होता. मोनाचा जन्म 1964 मध्ये दिल्लीत झाला. मोनाचे 201 2मध्ये कॅन्सरच्या आजाराने निधन झाले.

बोनी कपूरने जेव्हा मोनासोबत लग्न केले तेव्हा ते एकमेकांसाठी अनोळखी होते. 1983 मध्ये दोघांचे लग्न झाले. 1985 मध्ये अर्जुन कपूरचा जन्म झाला आणि 1987 मध्ये त्याची बहिण अंशुलाचा जन्म झाला. परंतु, काही वर्षांनी बोनी यांचे श्रीदेवीशी संबंध वाढत गेले. 1996 ला जेव्हा बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी लग्न केले तेव्हा मोना कपूर कपूर यांना जाणीव झाली की आपले घर तुटले आहे.

mona

मोनाने शांतपणे बोनी कपूरला नात्यापासून वेगळे केले. कारण श्रीदेवी लग्नापूर्वीच गरोदर राहिली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या लग्नाने दु:खी झालेल्या मोनाने 2007 ला एका मुलाखतीमध्ये सांगितले की, बोनीसोबत माझे अ‍ॅरेंज मॅरेज झाले होते. बोनी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. जेव्हा मी त्यांच्याशी लग्न केले तेव्हा माझे वय 19 होते. आमचे लग्नाला 13 वर्ष झाली होती.

मोना कपूरने सांगितले, जेव्हा मला समजले की माझ्या पतीचे अन्य कुणावर तरी प्रेम आहे तेव्हा मला मोठा धक्का बसला. बोनीला आता माझी नाही तर अन्य कुणाची तरी गरज होती. दुसरी संधी देण्यासाठी नात्यात काहीच शिल्लक राहिले नव्हते, कारण श्रीदेवी गरोदर होती. त्यांचे नाते कायम झाले होते. मी यातून बाहेर पडणेच चांगले होते. मोनाने या नात्याचे दु:ख शांतपणे पचवले.

Boney Kapoor
मोनाने मुलाखतीमध्ये म्हटले होते की, दोघांच्या लग्नाचा मुलांवरही खुप वाईट परिणाम झाला. माझा मोठा मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला तेव्हा शाळेत शिकत होते. शाळेत माझ्या मुलांना खुप वाईट-वाईट टोमणे मारले जात होते. परंतु, माझी मुलं त्यामुळे स्ट्राँग झाली आणि त्यांना सर्व परिस्थिती समजली.

श्रीदेवीशी लग्न केल्यानंतर बोनी कपूरने आपल्या पहिल्या पत्नीशी सर्व संबंध तोडले होते. अशा परिस्थितीत मोना शौरी कपूरने एकटीने अर्जुन आणि अंशुलाचा सांभाळ केला.

या कारणामुळेच अर्जुनने श्रीदेवीला कधीही आईचा दर्जा दिला नाही. एका मुलाखतीमध्ये अर्जुन म्हणाला होता की, श्रीदेवी फक्त माझ्या वडीलांची पत्नी आहे, माझी आई नाही. परंतु, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर हा सर्व कडवटपणा दूर झाला आणि अर्जुनने आपल्या सावत्र बहिणींना जवळ केले.