सपा आणि बसपाच्या वाटा वेगवेगळ्या

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाच्या सामन्यानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने आपापल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पोटनिवडणुका आणि २०२२ विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मायावती यांनी केली त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या वाटा आता वेगवेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी मायावतींना अलविदा केला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

मागील २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला अवघ्या पाच तर बसपाला शून्य जागा मिळाल्या होत्या.तसेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही या दोन्ही पक्षांना २ आकडी जागांवरच समाधान मानावे लागले होते. मोदी यांनी शहा यांना २०१९ च्या निवडणुकांमध्ये टक्कर देण्यासाठी तसेच पक्षाच्या भल्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामळे आता पोटनिवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा मायावतींनी केली. यावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव म्हणाले कि, समाजवादी पार्टीलाही ही गठबंधन करून लढण्यात काहीच रस नाही. येत्या निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनीही स्पष्ट केलं आहे. आपल्यातील राजकीय संबंध संपले असले तरी, आपले वैयक्तित संबंध चांगले ठेवू अशी माहिती मायावती आणि अखिलेश या दोघांनीही दिली. एवढचं नाही तर अखिलेश यादव यांनी मायावतींना अलविदा आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या आहे.