… त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेत्यांची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यांची नेहमी भाषणेही करमणुकीसाठी असतात. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत येथे भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केला.

फडणवीस म्हणाले की, सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला गेलेला होता. मात्र, आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर वचक बसवला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केल्याने जनता आज आमच्या पाठीशी आहे. मात्र, आता निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसची भाषणे म्हणजे एक करमणूक झाली आहे. यांची निम्मी भाषणे ही पंतप्रधान मोदींवर टीकेने भरलेली असतात. यांना जिथे-तिथे मोदी दिसतात. काहीजण तर रात्री मोदींमुळे घाबरून उठतात, अशी परस्थिती आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेत्यांची निम्मी भाषणे करमणुकीची असतात. आता चॅनेलवर ज्या प्रमाणे एखाद्या कार्यक्रमाबाबत सूचना येते, की या कार्यक्रमातील पात्र, घटना या काल्पनिक असून वास्तविकतेशी याचा काहीही संबंध नाही, अशा सूचना द्यायची वेळ यांच्या भाषणाबाबत आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...
You might also like