मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहिर ; विखेंना मिळाले ‘हे’ खाते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमडळाच्या विस्तारामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्र्यांच्या शपथविधी नंतर सायंकाळी खाते वाटप करण्यात आले. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण हे खाते देण्यात आले आहे. तर मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे.

नव्या कॅबिनेट मंत्र्यांना मिळालेले खाते
राधाकृष्ण विखे-पाटील (गृहनिर्माण)
अ‍ॅड. आशिष शेलार (शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण)
डॉ. संजय कुटे (कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण)
जयदत्त क्षीरसागर (रोजगार हमी व फलोत्पादन)
डॉ. सुरेश खाडे (सामाजिक न्याय)
डॉ. अनिल बोंडे (कृषी)
प्रा. डॉ. अशोक उईके (आदिवासी विकास)
प्रा. डॉ. तानाजी सावंत (जलसंधारण)
राम शिंदे (पणन व वस्त्रोद्योग)
संभाजी पाटील निलंगेकर ( अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण)
जयकुमार रावल (अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार)
सुभाष देशमुख (सहकार, मदत व पुनर्वसन)

नव्या राज्यमंत्र्यांना मिळालेले खाते
योगेश सागर (नगरविकास)
अविनाश महातेकर (सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य)
संजय उर्फ बाळा भेगडे (कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन)
डॉ. परिणय फुके (सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास)
अतुल सावे (उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्यांक राज्यमंत्री)
khate vatap

आरोग्य विषयक वृत्त-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून