वाहनांच्या काचावर ‘ब्लॅक फिल्म’ लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; पोलीस पुन्हा सक्रिय होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी करावाई सुरु केली होती. मात्र दरम्यानच्या काळात ही कारवाई थंडावली होती. मात्र, आता पुन्हा कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) राज्यातील पोलिसांना दिले आहेत. हे आदेश शनिवारी देण्यात आले आहेत.

कारच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या काळ्या फिल्म संदर्भात अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने २७ एप्रिल २०१२ रोजी आदेश दिले होते. गुन्हेगारावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काळ्या काचांवर आक्षेप घेतला होता.

यालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारच्या काचांवरील फिल्म काढण्याची मोहीम राबवली होती. मात्र, काही दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई थांबवली. सध्या सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरील काचांना फिल्म लावल्याचे दिसून येत आहे.

अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) पुन्हा एकदा राज्यातील सर्व पोलिसांना काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करून काळ्या फिल्म काढण्याचे आदेश दिले आहेत. तसचे संबंधीत वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आणि आरटीओ विभागाने डोळेझाक केल्यामुळे या कार निर्धास्तपणे धावत आहेत. महासंचालकांनी दिलेल्या आदेशामुळे राज्यात लवकरच काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कारावाईचा बडगा उचलला जाऊ शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावू नयेत, असे आदेश सर्वेच्च न्यायालायाने दिले आहेत.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’