Video : माजी आमदार दिलीप मोहितेंचे नाव चौकशीत समोर आलं : पोलिस आयुक्‍त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा मोर्चा हिंसक आंदोलनानंतर चाकण पोलीस ठाण्यावर आणि पोलीसांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सांगितले. तसेच पोलिस ठाण्यावरील हल्ल्याचा संबंध जोडून आंदोलनास गालबोट लावण्याचे काम सुरु असल्याचेही आयुक्त म्हणाले. दिलीप मोहिते यांना अटक होणार हे निश्चित झाले आहे.

राज्यात मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. याच मागणीसाठी चाकण येथे मराठा मोर्चा आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी आंदोलनास हिंसक वळण लागले. जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत दंगल घडली. यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले, पोलिस वाहने जळाली. यानंतर चाकण पोलिस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांवर हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी चाकण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला प्रकरणी आता प्रयत्न १०८ जणाना अटक, तर २३ जणांचा शोध सुरू असून १५ जणांची चौकशी सुरू आहे. सध्या याचे राजकीय भांडवल करण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. मात्र, मराठा मोर्चा आंदोलन आणि चाकण पोलिस स्टेशन हल्ला दोन्ही चा परस्पर संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी काही लोक आंदोलनाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेत त्यांना अटक करण्याचे संकेत दिले आहेत.

Loading...
You might also like