महिला सक्षमीकरणासाठी सरसावलेल्या ‛चंद्रभागा’कडून ‛एक लाखाच्या’ ठेवीवर ‛एक हजार व्याज’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – महिलांना सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे परंतु त्या योजनांचा लाभ हा खऱ्या अर्थाने गरजवंत महिलांना किती मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. हाच धागा पकडून महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केडगाव ता. दौंड येथील ‛चंद्रभागा’ महिला ग्रामीण पतसंस्था सरसावली असल्याचे दिसत आहे. या पतसंस्थेकडून आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांना लघु, गृह उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिनी दिवेकर यांना महिला बचतगट चालवत असताना महिलांना आर्थिक सुदृढ करण्यासाठी महिला पतसंस्था स्थापनेची कल्पना सुचली होती. त्यातूनच २०१३ साली ‛चंद्रभागा’ महिला ग्रामीण पतसंस्था अस्तित्वात आली.

महिला सक्षमीकरण करणे, महिलांना बचतीची सवय लावणे, दुर्बल घटकांतील महिलांना समाजात चांगले स्थान मिळवून देणे, सुशिक्षित बेरोजगार महिलांना व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य करणे हे द्येय घेऊन या पतसंस्थेने सहा वर्षांपूर्वी वाटचाल सुरू केली आणि आता त्याला चांगले यश मिळत आहे. या संस्थेमध्ये सध्या १३०० महिला सभासद असून या संस्थेवर असणाऱ्या सर्व महिला संचालिका या सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या आहेत.

ही पतसंस्था एक लाख रुपयांच्या ठेवीवर दर महा एक हजार रुपये व्याज देत आहे. या महा योजनेचा फायदा व्यापारी, उद्योजक आणि ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी केले असून चंद्रभागा महिला ग्रामीण पतसंस्था सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे पार पाडत असताना सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व अभिकर्तावर्ग सातत्याने कामकरीत असल्यामुळे संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे. संस्थेला यशाचे सर्वोत्तम शिखर गाठण्याकरिता आता मोठ्या ठेवीदार व हितचिंतकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे व मोठ्या ठेवींवर चांगले व्याजही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/