‘छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या बलिदानामुळेच महाराष्ट्रात क्रांती’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण भारतभर पसरलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर एक छत्री राजकीय अंमल सुरू केला व भारतीय लोकांना त्यांच्या छळातून बाहेर काढण्यासाठी देशात पहिल्यांदा क्रांतीची बिजे पेरली ती छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनीच, असे प्रतिपादन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकात केले.

छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकात सुरुवातीला हिंद सेवा मंडळाचे संचालक डॉ. पारस कोठारी व प्रशांत झांबरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. कोठारी यांनी हाताने तुतारी वाजवल्याने स्मारकात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते. तोडमल म्हणाले की, कोल्हापूरच्या दुष्काळ निवारणाच्या माध्यमातून छत्रपतींनी लोकांच्या मनात क्रांतीची बीजे पेरत रान उठवले. त्यातून रयत ब्रिटिशांच्या विरोधात उभी ठाकायला सुरुवात झाली. ब्रिटिशांना छत्रपतींची भीती वाटायला लागली. माधव बर्वे नावाच्या कपटी व्यक्तीला हाताशी धरून ब्रिटीशांनी महाराजांची अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांची निर्घृण हत्या घडवून आणली. छत्रपतींच्या हत्तेची बातमी कळताच महाराष्ट्रात असंतोष निर्माण होऊन ठिक ठिकाणी उठाव झाले व त्याचेच परिवर्तन आपल्या स्वातंत्र्यात झाले. आजच्या क्रांतिदिनी त्यांना विसरून चालणार नाही.

शाहू महाराजांनीच आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर देशात सर्वत्र शैक्षणिक संस्था सुरू करत भारतीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, अशी माहिती प्रशांत झांबरे यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या शैक्षणिक कार्याची ओळख करून देत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदिप वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन आदेश गुंजाळ यांनी केले.

यावेळी बाधकाम व्यवसायिक स्थापत्य अभियंते हेमंतराव मुळे, अजित भोर, श्रीपाद दगडे, अभिजित शिंदे, विनित पोकळे, विशाल म्हस्के, सुरज भोर, सचिन भोर, मयुर भोर, विकास भोर आदी विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –