काय सांगता ! होय, अंडे 2 रूपयांना तर चिकन 50 रूपये किलो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसमुळे बाजारात मिळणाऱ्या चिकनबाबत अनेक अफवा पसरत होत्या. ज्याचा परिणामी चिकनवर झाला होता. त्यात आता कोंबडीच्या अंड्यांच्या मार्केटवरही त्याचा परिणाम दिसत आहे. देशात मुंबईत अंड्यासाठी सर्वाधिक भाव मिळतो, परंतु या महिनाभरात अंड्याच्या किंमतीतही घसरण झाली आहे. अर्थात ही घसरण घाऊक बाजारात असली तरी सर्वसामान्यांसाठीही आता अंडे सरासरी ५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात अंड्याचा दर इतका खाली घसरला कि, किमान दराला म्हणजे शेकड्यासाठी ३६५ रूपये भाव आहे. तर फेब्रुवारी महिन्यात सरासरी किंमत ही शेकड्यासाठी ४०९ रूपये इतकी होती. देशात अंड्याचा सर्वाधिक कमी भाव अजमेरमध्ये होता, म्हणजेच शेकड्यासाठी ३३६ रूपये २० पैसे असा होता. शेकड्यासाठी २.९५ रूपयांचा भावदेखील २५ फेब्रुवारीला नोंदवला गेला आहे. अजमेरनंतर हरियाणातील बरवाला येथे अंड्याला कमी भाव मिळाला आहे. त्याठिकाणी शेकड्याला ३३६ रूपये २२ पैसे असा भाव मिळाला आहे.

चिकनच्या भावातही घसरण :
कोल्हापुरात चिकनच्या प्रत्येक किलोसाठीच्या भावालाही फटका बसला आहे. कोल्हापुरात चिकन अवघ्या ५० रूपये किलोने विकले जात आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला तब्बल १५० कोटी रूपयांचा फटका बसला हे. कोल्हापुरातील कोंबड्यांना गोव्यात मोठ्या प्रमाणात मागणी असले. पण गोव्यात पसरलेल्या कोरोना व्हायरच्या अफवेमुळे कोंबड्यांच्या मागणीवर परिणाम झालेला पहायला मिळतो. कोल्हापुरात आजरा तालुक्यातून कोंबड्यांना मोठी मागणी असते. पण कोरोनाच्या अफवांमुळे या भागातील पोल्ट्री व्यवसाय दरकपात सहन करावी लागत आहे.