राजकारणी म्हणजे ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ : मुख्यमंत्री ठाकरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मी ही एक नेमबाजपट्टू आहे. मात्र आमच्या राजकारण्यांचे ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असा निशाणा असतो. मात्र पोलिसांचा निशाणा आणि निगाहे एकच असतात असे गमतीशीर व्यक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकेबाजी केली.

१३ व्या अखिल भारतीय पोलिस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात उद्धव ठाकरे हजर होते. यावेळी ते बोलत होते. “राजकारणात आणि पोलिसांत फरक आहे. राजकारणात ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असं असतं. मात्र, पोलिसांचा ज्या ठिकाणी निशाणा आहे तिथेच असतो. तुमचा नेम कधीच चुकत नाही”, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी…तुमचा विजय निश्चित आहे, अशा शब्दांत विजेत्या स्पर्धकांचं मनोधैर्य वाढवलं. पोलिसांच्या नेमबाजीचा ‘स्कोर’ प्रसिद्ध करावा, यामुळे सराईत गुन्हेगारांच्या मनात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही असे ठाकरे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/