चिंतामणी गणपती मंदिरात गणेशयागाचे आयोजन, भक्तांना महाप्रसादाचे वाटप

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – गणेश उत्सवाची सांगता झाल्यानंतर थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात वंशपरंपरागत पुजारी आगलावे बंधू यांच्यावतीने दरवर्षी गणेशयाग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आज शुक्रवार रोजी मोठ्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गणेश चतुर्थीस संपुर्ण राज्यात बाप्पाची मोठ्या थाटात प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर दहा दिवस बाप्पाची आरास करण्यात येते. त्यानंतर अनंत चतुर्दशीस बाप्पाला निरोप दिला जातो. थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र. येथे दरवर्षी मंदिराचे पुजारी आगलावे बंधू यांच्यावतीने पौर्णिमेच्या दिवशी गणेशयागाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी आज शुक्रवारी या गणेशयागाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना तसेच स्थानिक ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यामध्ये मुकुंद आगलावे, राजेंद्र आगलावे, महेश आगलावे, चेतन आगलावे, किर्तीराज आगलावे, सचिन आगलावे, राहुल आगलावे, अजय आगलावे, गणेश आगलावे, रविंद्र आगलावे आदींनी सहभाग घेतला होता