चिंतामणी गणपती मंदिरातील सभामंडपाची कौलं ‘निखळली’, दुरुस्तीची तातडीने आवश्यकता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदीरातील सभामंडपावरील एका बाजुची कौले कोसळली आहे. तर दुसऱ्या बाजूची कौलं अजूनही धोकादायक स्थितीत तशीच आहेत. दोन आठवडे झाले पाऊस थांबून परंतु संभा मंडप दुरुस्ती करण्यास चिंचवड देवस्थान कडून चालढकल होत आहे. प्रशासनाला याचे गांभीर्य कधी कळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या धोक्याबद्धल मंदीरातील पुजारी यांनी पावसाळा सुरु होण्यापूर्वी सभामंडप दुरुस्तीची मागणी देवस्थानकडे केली होती परंतु त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले. परिणामी आॕगस्ट माहिन्याच्या सुरुवातीलाच एक बाजूची कौले अचानकपणे निखळून पडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. कौलांना लावलेली लाकडी आधार पट्टी कुजल्यामुळे एक बाजुने तुटल्याने सभामंडपावरील कौले खाली आली असून दुसऱ्या बाजूची देखील तिच अवस्था असून साईड पट्टी कुजलेली असल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही क्षणी ती कौले निखळन्याची शक्यता आहे. तसेच मंदीराच्या सभामंडप समोर असलेल्या नगारखानाची कौलांची देखील दुरुस्ती होणे गरजेची आहे. त्यामुळे सदर घडलेल्या गंभीर घटनेची दखल देवस्थानने घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

याविषयी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंदार देव यांनी सांगितले की, सभा मंडप दुरुस्तीचे काम पावसाळ्या अगोदरच करणे अपेक्षित होते. परंतु याची निविदा काढण्यात उशीर झाला तरीही हे काम लवकरात लवकर करुन घेतले जाईल. कामाच्या निविदा काढण्यात आली आहे.