कुख्यात चॉकलेट सुन्याच्या साथीदारांचा ‘उपद्रव’ सुरुच ; बांधकाम ठेकेदराला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कुख्यात चॉकलेट सुन्याला पोलिसांनी अटक केली. दत्तवाडी येथे निलेश वाडकर याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सुन्याला अटक केली आहे. सुन्याला अटक केली असली तरी त्याचे काही साथीदार अद्याप मोकाट फिरत आहेत. सुन्याच्या टोळीतील नितीन मिटकरी आणि त्याचा दोन साथीदारांनी एका बांधकाम ठेकेदाराला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

बसवराज कन्ने (वय-३० रा. इंदिरानगर, गुलटकेडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कन्ने हे बांधकाम ठेकेदार असून दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना आडवले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून लुटले. हा प्रकार १३ जुलै रोजी सनी ट्रॅव्हल्सजवळ रात्री आठच्या सुमरास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्ने हे काम संपवून घरी जात होते. त्यावेळी तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यांच्या पाकीटातील २४ हजार ५०० जबरदस्तीने कढून घेतले. कन्ने यांनी सोमवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नितीन मिटकरी याने केला असल्याचे उघड झाले असून गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like