धुळे : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

जिल्ह्यातील सातवी घटना

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. आज सायंकाळी पोलीस उपअधिक्षक कार्यालय जवळील काही अतंरावर असलेल्या मार्केट यार्ड वाखारकर नगर जवळील नित्यानंद नगरात राहणाऱ्या वृध्देची तीन तोळेची सोनसाखळी धुम स्टाईलने चोरट्यांनी लंपास केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि, आज रविवारी सायंकाळी नित्यानंद नगरात राहणाऱ्या मधुबाला जयस्वाल वय.58 वृध्द महिला देवाचे दर्शन घेण्यासाठी घरा बाहेर पडल्या त्या रस्त्यावरील चौकात रस्ता विरुध्द बाजुला जात असताना वृध्द महिलेचा मोटरसायकलवर येणाऱ्या दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी महिलेला जोरदार धक्का देत मधुबाला जयस्वाल यांचे गळ्यातील तीन तोळेची सोन्यांची सोनसाखळी अंदाजे किंमत दीड लाख रुपयेची धुम स्टाईलने लंपास केली. महिलेने आरडा-ओरड केला. उपअधिक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अतंरावर हि घटना घडल्याने परिसरात पोलीसांचा वचक राहिलेला नाही अशी नागरीकांत चर्चा सुरु होती.

महिलेने सोनसाखळी चोरी बाबत आझाद नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंद केली आहे.

You might also like