३ सराईत पुणे पोलिसांच्या जाळ्यात ; १० गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन चोरी, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दहा गुन्ह्यातील ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जे.एस.पी.एम. कॉलेजच्या गेट क्रमांक ३ जवळ करण्यात आली. आरोपींनी पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच जामखेड परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ओंकार विनोद मासाळ उर्फ हर्षद सलीम शेख (वय-२० रा. साईविहार कॉलनी हडपसर, सध्या रा. शेवाळवाडी), किरण उर्फ जॉय मॅनवल रुपटक्के (वय-२१ रा. काळेपडळ, मुळ. ठोसर, जि. नगर), स्वप्निल नागनाथ बोधले (वय-१९ रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. ओंकार मसाळ हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये फरार होता.

जे.एस.पी.एम. कॉलेजच्या गेट क्रमांक ३ जवळ तिघे उभारले असून त्यांच्याकडे असलेली यामहा (एमएच १२ जीएच ७१०६) चोरीची असल्याची माहिती पोलीस शिपाई नासीर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी वानवडी, कोंढवा, हडपसर, मार्केटयार्ड, खडक, शिक्रापूर, जामखेड परिसरात वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त सहास बावचे, हडपसर विभागाचे साहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस उप निरीक्षक राजेंद्र गायकवाड, रमेश भोसले, पोलीस हवालदार राजु रासगे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, ज्ञानदेव, सुदर्शन बोरावके, संभाजी देवीकर, नवनाथ खताळ, शिरीश गोसावी, प्रतिक लाहीगुडे, महेश कांबळे यांच्या पथकाने केली.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा