राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव घेणं ‘टाळलं’, मानले ‘आभार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सह्याद्रीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वांचे आभार मानताना मात्र फडणवीस यांनी युतीत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे नाव घेणे टाळले.

फडणवीस म्हणाले की, आज मी राज्यपालांकडे राजीनामा सोपावला आहे, राज्यपालांनी तो स्वीकाराला. राज्याची 5 वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आभार. केंद्राने, केंद्रातील मंत्र्यांनी केलेले सहकार्य, राज्यातील मंत्रिमंडळातील नेत्यांनी केलेले सहकार्य यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आमच्या सोबत असलेल्या पक्षांचे देखील आभार मानतो.

यावेळी आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी आमच्या सोबत सत्तेत असलेल्या पक्षांचे, जे कोण हे तुम्हाला देखील माहित आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. असे म्हणतं फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोमणा मारला. फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेचे नाव न घेता आभार मानल्याने त्यांच्यातील कटूता वाढली आहे का अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आम्ही केले. त्यात 4 वर्ष दुष्काळ होता आणि आता शेवटी ओला दुष्काळ. परंतू या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं होतं, असे देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके