महापुराच्या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख मदत : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी महापुराच्या संकटामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मदत करू असे आश्वासन दिले आहे. पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहीती त्यांनी दिली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने दुर्घटना घडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मुंबईवरून डॉक्टर आणून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. कर्नाटकातील आलमपट्टीचा विसर्ग वाढविल्यास परिस्थिती सुधारेल. कर्नाटक सरकारला ५ लाख क्युसेकने आलमपट्टी धरणातून पाणी विसर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा खराब हवामानामुळं सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. पत्रकार परिषदेवेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार संभाजी महाराज उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like