अखेर खातेवाटप झालं ! जाणून घ्या शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचं अखेर खातेवाटप झालं आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 2-2 मंत्र्यांकडे कोणत्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे आहे.

1. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
2. एकनाथ संभाजी शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

3. छगन चंद्रकांत भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

4. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात – महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

5. सुभाष राजाराम देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रिशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास

6. जयंत राजाराम पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्याग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण