विधानसभेसाठी कॉंग्रेसचा स्वबळाचा नारा, वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत दारूण पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकित राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सुर निघाला. राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राष्ट्रवादी भाजपला मदत करते
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला लोकसभा निव़डणूकीत दारूण पराभव स्विकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक पार पडली. तर काँग्रेसची चिंतन बैठक आज पार पडली. या बैठकित राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला. राष्ट्रवादी भाजपला मदत करते. त्यामुळे आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे काम करणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीऐवजी वंचित बहुजनसोबत आघाडी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

शिवसेना भाजपने लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही त्यांनी युतीची घोषणा केली आहे. तर त्यांच्या जागावाटपाचे सुत्रही ठरले आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी अजूनही चिंतन करण्यात व्यस्त आहे. त्यात लोकसभा निवडणूकीत दारूण पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकित राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सुर निघाला. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर लावत राष्ट्रवादी ऐवजी वंचित चालेल अशी भूमिका घेतल्याने नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूकीत वंचितचा आघाडीला मोठा फटका बसला आहे. वंचित आघाडीने विधानसभा स्वबळावर लढण्य़ाचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र काँग्रेसने प्रस्ताव ठेवला तर वंचितची भूमीका काय असेल, त्यानंतरची राजकिय गणितं काय असतील याचा तर्क वितर्क लढवले जात आहे.