‘वंचित’ आघाडीमुळं लोकसभेत आम्हाला ९ जागांवर फटका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांची कबुली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन विकास आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महाराष्ट्रात ९ जागांवर फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहीजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभा यशस्वी झाल्या. सभांच्या चर्चाही झाल्या. मात्र ही गर्दी मतात परावर्तित का होवू शकली नाही. आघाडीसाठी मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल.

सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्य घटनेमुळेच आले आहेत. मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मुलभुत तत्वांना सुरूंग लावला जात आहे. लोकशाही चांगली, सदृढ राहावी, यासाठी बाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले.

आरोग्यविषय वृत्त –