home page top 1

राज्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे होणार ‘पंचनामे’

जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, ब्लॉकप्रमुखांवर हकालपट्टीची 'टांगती तलवार'

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या दारुण पराभवाला कोण- कोण कारणीभूत आहेत, याचा ‘पंचनामा’ करून अशा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांचा ‘ लेखाजोखा ‘ घेण्यात येणार आहे. परिणामी अकार्यक्षम आणि दगाबाज असणाऱ्या जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, ब्लॉकप्रमुखांवर हकालपट्टीची ‘ टांगती तलवार ‘ अटळ आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील हेवेदावे हेच मुख्य कारण असले तरी मित्रपक्षांनी धोका दिला. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीला जेमतेम ८० -८१ दिवसांचा कालावधी राहिला आहे, यापार्श्वभूमीवर राज्यात यश मिळविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या जागांवर विजय निश्चित मिळेल अशा जागांचा कच्चा आराखडा तयार केला आहे आणि त्यानुसार महाआघाडीत जागावाटपाचे सूत्र ठरविले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये ,यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील काँग्रेसच्या स्थितिविषयी आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष , सरचिटणीस, ब्लॉकप्रमुख यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामकाजाचे मूल्यमापन करताना त्यांच्याविषयी असलेल्या तक्रारीची शहानिशा करून अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येणार आहे.

कारण या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील स्वतःचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपला छुपी साथ दिल्याची वस्तुस्थिती असल्याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे. त्यानुसार आता नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून विधानसभेला पुन्हा पानिपत होऊ नये यासाठी काँग्रेसने राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराचे ‘पोस्टमार्टेम ‘ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

Loading...
You might also like