महत्वाचे…बँक नाही आता आपण घेणार आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डच्या सेवा चालू किंवा बंद करण्याचा निर्णय, ‘जाणून घ्या’ कसे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता ग्राहक अधिक सक्षम होणार आहेत कारण कोणत्याही डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्डच्या सेवांच्या बाबतीत बँक नाही तर ग्राहक स्वतः निर्णय घेणार आहात. रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना सूचना दिल्या आहेत की ग्राहकांना अधिक स्वतंत्रता दिली जावी. तसेच बँकांना सांगण्यात आले आहे की आता कोणत्याही प्रकारच्या सेवा सुरू किंवा बंद करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना देण्यात यावे.

कोणत्या सेवांना आपण सुरु किंवा बंद करू शकता

इंटरनेट बँकिंग –
इंटरनेट बँकिंग, एटीएमचा वापर, ऑनलाइन शॉपिंग आणि विक्रीच्या ठिकाणी कार्ड स्वाइप हा प्रकार असतो. मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, आता ग्राहक त्यांच्या डेबिट-क्रेडिट कार्डचा उपयोग स्वत: घेण्यास सक्षम असणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करत नसाल तर तुम्ही ते स्वतःच ते बंद करू शकता. या व्यतिरिक्त, बहुतेक कार्ड हे आधीपासूनच आंतरराष्ट्रीय वापरासाठी मान्यताप्राप्त आहेत. यामुळे कार्डमधून पैशांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. आता आपण ही सुविधा आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डमधून स्वतःच हटवू शकता.

कोणत्या सेवा बँकांनी देणे बंधनकारक आहे
रिझर्व्ह बॅंकेने सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना सांगितले आहे की आपल्या सर्व ग्राहकांना ट्रांजॅक्शन अलर्ट, वेळोवेळी दिली जाणारी माहिती आणि बॅलेन्सचे स्टेटस हे एसएमएस वा इमेलने देणे बंधनकारक आहे. या सेवांमध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत.

या सेवा करा त्वरित बंद
बँकेशी संबंधित एक अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सध्या सर्वच बँका आपल्याला इंटरनॅशनल कार्ड उपलब्ध करून देत आहेत. तसे तर यांपासून काही नुकसान नाही दिसत परंतु सर्वात जास्त बँक घोटाळे यांपासूनच होतात. कारण हे कार्ड संपूर्ण जगात सगळीकडे वापरात येत असते. म्हणूनच बर्‍याच वेळा चोर आंतरराष्ट्रीय बँकावरील पैसे चोरी करण्यासाठी सोशल साइट किंवा थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे तुमची बँकिंग माहिती वापरतात. याशिवाय आजकाल बँका वाय-फाय सुसज्ज किंवा कॉन्टॅक्टलेस व्यवहार असलेली कार्डे देत आहेत. अशा कार्डमध्ये २ हजारांपर्यंतच्या व्यवहारात पिनची आवश्यकता नसते. जर फार महत्वाची वाटत नसेल तर ही सेवा देखील बंद केली जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/