महावितरणचा कर्मचारी रोहित्रावर लिंक टाकताना दगावला, उरुळी देवाची येथील घटना

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – उरुळी देवाची येथे रोहित्रावर लिंक टाकण्यासाठी गेलेल्या वायरमणला शाॅक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नेमका या रोहित्राचा विज प्रवाह चालू कसा झाला हा प्रश्न आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हडपसर परिमंडला अंतर्गत उरुळी देवाची येथे कृषी क्षेत्राला पुरवठा करणार्या विद्युत रोहित्राचा डीओ (लिंक) गेला होता तेथे कर्तव्यावर असणारे वायरमण अनिल काजवे तो डिओ टाकण्यासाठी रोहित्रावर चढले त्यांनी आपल्या हातात ग्लोज घालुन तो टाकताना तेथे त्यांच्या शरिराचा भाग चिकटला. आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. परंतु या वायरमणकडे लिंक राॅड कसा नव्हता तसेच या रोहित्राचा प्रवाह कसा चालू झाला.यासाठी परवानगी घेतली होती का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या परिमंडलाचे अधिकारी उप अभियंता भरते फोन उचलत नाहीत यामुळे याचे गुढ आणखीनच वाढत आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल काजवे यांची दप्तरी ड्युटी फुरसुंगी येथे आहे परंतु त्यांना उरुळी देवाची येथे काम करण्यास सांगण्यात आले होते. काजवे हे अतिशय मेहनती प्रेमळ स्वभावाचे होते. आज महावितरणचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम वाघोली येथे होता. परंतु ते आपले काम पूर्ण करण्यासाठी थांबले. त्यांनी परवानगी घेतली होती असे कळते परंतु नेमकी काय गडबड झाली हे आणखी गुलदस्त्यातच आहे. यात महावितरण की पारेषण दोषी हा तपासाचा विषय आहे.

या घटनेचा लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

Visit : Policenama.com