भाडेकरूला लोखंडी गजाने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – खोली रिकामी करण्याच्या वादातून घर मालकाने भाडेकरूला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

दत्तात्रय दगडू पाचंगे (३७, रा. तुपेवस्ती, मोशी) असे जखमीचे नाव असून त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर राम सुरेश अवचीते (३५, रा. तुपेवस्ती, मोशी), शहा (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हे राम यांच्या खोलीत भाड्याने राहतात. त्यांच्यामध्ये रविवारी खोली रिकामी करण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणात घरमालक राम याने दत्तात्रय यांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली.

दरम्यान दत्तात्रय यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यामध्ये दत्तात्रय जखमी झाले आहेत. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like