चाकूच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चाकूच्या धाकाने रस्त्यात अडवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १६/०४/२०१९ रोजी फिर्यादी श्री. आनंद बाबासाहेब कदम (वय-३०, वर्षे, रा. ब्राम्हणी ता.राहुरी, अहमदनगर) हे त्यांचेकडील आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला घेवुन थांबले असतांन त्यावेळी बजाज सिटी १०० मोटारसायकलवरुन आयशर टेम्पो मध्ये प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवून वरील नमुद वर्णनाचा मुददेमालबळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी राहुरी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ॥ २७४/२०१९ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील कर्मचारी यांचे मार्फतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/दिलीप पवार यांना गुप्त खब-याकडून माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हयातील चोरी गेलेला मोबाईल हा बनेखाँ अलिजान शेख रा.ब्राम्हणी ता.राहुरी याचेकडे असून तो सध्या सोनई गावात आहे अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई श्री.सचिन खामगळ,पोहेकॉ/मनोहर गोसावी, रविन्द्र कर्डीले, संतोष लोढे, दत्ता गव्हाणे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल सोळंके,मच्छिद्र बर्ड,चालक संभाजी कोतकर अशांनी मिळून सोनई ता.नेवासा येथे जावून बातमी मिळालेल्या वर्णनावरुन व माहीतीवरुन सदर इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हातील मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सदर मोबाईल बाबत ताब्यात घेतलेला इसम नामे १) बनेखाँ अलिजान शेख वय-२३, रा.ब्राम्हणी ता.राहुरी यास विचारपुस करता त्याने कळवीले की सदर मोबाईल मला आरीफ गफुर शेख , रा.पिंप्री अवघड ता.राहुरी याने दिला असल्याबाबत कळवीले असता आरीफ याचे राहते घरी प्रींप्री अवघड येथे जावुन तो घरी मिळून आल्याने २) आरीफ गफुर शेख वय-२७, रा.पिंप्री अवघड ता.राहुरी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांस अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार नामे ३) सागर पोपट हरीचंद्रे, रा.रेल्वे स्टेशन खडांबा ता.राहुरी (फरार) यांनी दोघांनी मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

आरोपी नं.३ याचा त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो मिळून आला नाही. गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी एक सॅमसंग जे ६ मॉडेलचा मोबाईल त्याची किं १०,०००/- हा हस्तगत करण्यात आला असून आरोपी क्रं.१ व २ यांना तसेच मुद्देमालासह राहुरी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील
कार्यवाही राहुरी पो.स्टे. हे करीत आहेत.

Loading...
You might also like