सख्खा भावाला घरासह पेटवून दिलं, दोघे गंभीर जखमी : जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ वादातून सख्खा भावाला घरासह पेटवून दिले. यात दाम्पत्य जखमी झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे ही आज सकाळी ही घटना घडली.

गोरख भदे, त्यााची पत्नी सुरेखा भदे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, गाेरख भदे यांचे शरद भदे याच्यासोबत वाद झाले होते. त्या वादातून गोरख यांच्या घराला बाहेरून कडी लावून शरद भदे याने घराचे छप्पर दिले पेटवून दिले. आगीचा भडका उडताच ग्रामस्थांनी दाम्पत्याला बाहेर काढले. आगीत होरपळून दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात शरद भदे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –