कचरा डेपोची आग संशास्पद : चौकशीची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सावेडीच्या कचरा डेपोला लागलेली आग संशयास्पद आहे. या आगीची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देणार असल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, योगीराज गाडे, दत्ता कावरे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. राठोड म्हणाले की, ‘आगीच्या घटनेमागे वेगळाच वास आहे. मागच्या वर्षीही याच काळात आग लागली होती. हा डेपो ज्यांनी येथे आणला, तेच आता हा डेपो काढा म्हणत आहेत. कचरा डेपो आणण्यात व आता येथून काढण्यातही काहीतरी वेगळाच विचार सुरू आहे. त्यामुळेच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.’

Loading...
You might also like