#Loksabha : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगार असल्याची जाहिरात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती केवळ प्रतिज्ञापत्रात देऊन मी चांगला उमेदवार आहे. मलाच निवडून द्या म्हणत प्रचार करणाऱ्या गुन्हेगार उमेदवारांना प्रचाराबरोबरच आपल्यावर दाखल गुन्ह्यांची आता जाहीरात करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. तशा सुचना उमेदवारांना दिल्या असल्याची माहिती रामटेक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी दिली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती केवळ प्रतिज्ञापत्रात देऊन ती जनतेपासून दडवता येणार आही. त्याला आपल्या गुन्हेगारीचीही जाहीरात करावी लागणार आहे. संबंधित उमेरदवाराला वृत्तपत्र आणि टिव्हीवर मी गुन्हेगार असल्याची जाहीरात करावी लागणार आहे. माझ्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत किंवा खटले सुरु आहेत. अशी माहिती द्यावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना याची माहिती देण्यात आली आहे.

आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहिरातीच्या स्वरुपात द्यावयाची आहे. त्यामुळे ती अत्यंत लहान आकारात देण्यात येण्याची पळवाट काढली जाऊ शकते म्हणून आयोगाने ही जाहिरात चांगला खप असलेल्या दैनिकांत कोणत्या फॉन्टमध्ये छापावी याच्याही सुचना दिल्या आहेत. निवडणूक संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत या जाहीरातींची माहिती निवडणूक अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे. त्यासोबत जाहीरात छापून आलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती सादर कराव्या लागणार आहेत. विशेष म्हणजे अशी जाहीरात ३ वेळा द्यावी लागणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी ही जाहीरात दिली नाही तर आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते.

Loading...
You might also like