‘ऐलमा पैलमा.. गणेश देवा, माझा खेळ मांडु दे करीन तुझी सेवा…’ दिव्यांगांनी जिंकली मनं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘ऐलमा पैलमा.. गणेश देवा, माझा खेळ मांडु दे करीन तुझी सेवा…’, ‘एके दिवशी काऊ आला गं नाई…’, ‘आडबाई आडोणी… आडाचं पाणी आडोणी’, अशी पारंपारिक गाणी म्हणत दिव्यांग विद्यार्थ्यांनी महाभोंडला सादर केला. फेर, ओव्या, दांडीया, वेशभूषा आणि खिरापत अशा स्वरुपात दिव्यांगांनी कार्यक्रम सादर केला.

भारतीय संस्कृती व सणांची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि आपले मुख्य सण साजरे करताना खेळल्या जाणा-या या पारंपारिक खेळाची ओळख दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट व कोथरूडच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाभोंडला व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. यावर्षी २०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. गोखलेनगरच्या कामायनी संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मालती भामरे, अभय शास्त्री, श्रध्दा पेठे, रेश्मा माळवदे, श्रीलेखा कुलकर्णी, रीतू नाईक, उपक्रम प्रमुख सीमा दाबके व अनुराधा शास्त्री तसेच कामायनीचे संस्थेचे कालीदास सुपाते व सुजाता अंबे उपस्थित होते. सुत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले.

कामायनी गोखलेनगर शाळा व कार्यशाळा, सेवासदन दिलासा केंद्र लक्ष्मीरोड, गुरूकृपा, शुभदा कार्यशाळा, जर तरटे मुक्तशाळा, जीवनज्योत शेल्टर वर्कशॉप या संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग होता. उत्कृष्ट वेशभूषा आणि दांडिया सादर करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी खास बक्षीसं देण्यात आली. सर्व मुलींनी, मुलांनी आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-र्यांनी गाण्याच्या तालावर दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

बक्षीसे : दांडीया

विद्यार्थी – प्रथम: शुभम पानसरे, द्वितीय: गौरव वांजळे, तृतीय: अमन आल्हाट, चतुर्थ: प्रशांत रणदिवे

वेशभूषा

मंथन खिलारे, आदेश पाथरकर, अमन शेख, प्रदीप कुशावह

दांडीया: विद्यार्थीनी

साक्षी धुमाळ, तनया बर्वे, श्र्वेता पुजारी,  आरती पवार

वेशभूषा

सुप्रिया गायकर, महालक्ष्मी अय्यर, चैत्राली पोटे, रीया गुजर

शिक्षक दांडीया

विकास पवळे, अजय बोराडे

वेशभूषा

आनंद अडसूळ

शिक्षिका दांडीया

शुभांगी अंबूरे, पद्मा सावदेकर, कविता बरडोले

वेशभूषा

प्रज्ञा खिलारी, सुनीता सोनवलकर, नंदा गेंगजे

सेवक दांडीया

अजीत कासूर्डे, राजश्री ओंकार

Visit : Policenama.com