यावेळी पवारांचेही ऐकणार नाही, ‘वंचित’ने तिकीट दिले तर संधीचं सोनं करणार : बादशाह शेख

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीने जर विधानसभेचे तिकीट दिले तर नुसते उभेच राहणार नाही तर संधीचे सोनेही करून दाखवेल आणि पवार साहेबांनी जरी मला थांबण्यास सांगितले तरी त्यांचे न ऐकता वंचित बहुजन आघाडीशी एकनिष्ठ राहील असा विश्वास दौंड चे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बादशाह शेख यांनी आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांच्याशी बोलताना व्यक्त केला.

बादशाह शेख हे दौंडचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड नगरपरिषदेचे गट नेते आहेत. बादशहा शेख यांना दौंड शहरासह तालुक्यामध्ये मानणारा मोठा वर्ग असून गरिबोका बादशाह म्हणून त्यांना दौंड शहरामध्ये ओळखले जाते. शरद पवारांचे अतिशय जवळचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती परंतु पक्षांतर्गत कुरखोड्यांना वैतागून त्यांनी एकला चलो रे चा नारा दिला असावा असा कयास सध्या लावला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून जर बादशाह शेख यांना उमेदवारी देण्यात आली तर तालुक्यामध्ये एक वेगळेच चित्र पहायला मिळेल यात शंका नाही कारण कित्येक वर्षांपासून बादशहा शेख हे समाजकारणामध्ये कार्यरत असून त्यांनी आपल्या विशेष शैलीने आणि सामाजिक कार्याने संपूर्ण दौंडकरांची मने जिंकून दाखवली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

Loading...
You might also like