Video : यात्रेमध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा…

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या सय्यद शाहमीर उर्फ शादावल बाबा यांच्या यात्रेतील शेकडो वर्षांची परंपरा..

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – धगधगत्या निखाऱ्यांवरून चालण्याची शेकडो वर्षांची परंपरा पाहून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. पायात काहीही न घालता पुरुष आणि स्त्रिया दोघेही मोठ्या श्रद्धेने आगीच्या निखाऱ्यांवरून येथे चालताना पाहायला मिळतात.

होय हे खरं आहे. आम्ही दौंड तालुक्यातील वाखारी या गावात भरणाऱ्या यात्रेबाबत बोलतोय. वाखारी गावामध्ये सय्यद शाहमीर उर्फ शादावल बाबा यांची दर्गा असून हि दर्गा हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक आहे. या गावामध्ये यात्रेनिमित्त जमलेले हिंदू-मुस्लिम भाविक पिढ्यानपिढ्या निखाऱ्यांवरून चालण्याची चालत आलेली हि परंपरा मोठ्या श्रद्धेनं पार पाडताना दिसतात.

या ठिकाणी नवस मागणाऱ्याचा नवस पूर्ण झाला की त्यांना या रखरखत्या निखाऱ्यांनी अंघोळ घातली जाते आणि नवस फेडला जातो. या यात्रेसाठी मुस्लिमांबरोबरच हिंदू भाविक ही मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अतूट नाते या यात्रेच्या निमित्ताने येथे पहायला मिळते.