पारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय ? महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निडणुकीचे बिगुल वाजणार आहे. येणाऱ्या या निवडणुकीसाठी दौंड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह महेश भागवत, आनंद थोरात, अप्पासो पवार इच्छुक असून वैशाली नागवडे याही चर्चेत आहेत.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी वर्षानुवर्षे इमान इतबारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचा या वेळी तरी विचार करण्यात येईल असाही प्रश्न इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. कारण २०१३ साली राष्ट्रवादीच्या अंतर्गत कुरखोड्यांना वैतागून राष्ट्रवादीत असणारे राहुल कुल जे पक्ष सोडून रासपमध्ये गेले होते त्यावेळी त्यांचे खंदे समर्थक असूनही महेश भागवत हे त्यांच्या सोबत न जाता आपल्या भीमा पाटस कारखाण्याच्या संचालक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले होते तश्याच पद्धतीने आनंद थोरात व सत्वशील शितोळे यांनीही आपल्या संचालक पदाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसशी एकरूप राहिले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीला यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठ काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण दौंडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या अठरा वर्षांपासून तिकीट मिळाले तर राष्ट्रवादी आणि नाही मिळाले तर दुसरा पर्याय असा निर्णय घेणारी नेते मंडळी आणि तिकीट मिळो न मिळो पण आपला पक्ष फक्त राष्ट्रवादीच अशी मनाशी खूनगाठ बांधलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकरी, कार्यकर्ते असा हा फरक असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे आतातरी इमाने इतबारे पक्षाचे काम करणाऱ्या या जेष्ठ पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून संधी मिळेल का असा प्रश्न ही ते उपस्थित करत आहेत.

दौंड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात हे प्रबळ दावेदार असून त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांसह जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे याही चर्चेत आहेत.

वास्तविक पाहता दौंडमध्ये रासपचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे प्रत्येक गावात प्रबळ गट आहेत. परंतु या गटांना ताकद देण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले असून वरील इच्छुक उमेदवारांचा या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात मोलाचा वाटा आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या वाढत आहे आणि निष्ठावानपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बाबत निर्णय घेताना पवारांची डोकेदुखी वाढणार असून शरद पवार कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील हे सर्वांनी मान्य करायचे हे ही ठरले असले तरी पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा तालुका आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांना किती रुचेेेल हे सध्यातरी सांगणे अवघड आहे.

आरोग्यविषयक वृत्त –