‘न खाऊंगा, न खाने दूंगा’मुळे केडगावचे सरपंच ‘टार्गेट’ !

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत सध्या वेगळ्याच परिस्थितीमधून जात आहे. केडगाव येथील सरपंच हे सध्या न खाऊंगा, न खाने दूंगा या संकल्पनेतून कारभार चालवत असल्याने अनेक लाभार्थी दुखावले गेले आहेत. त्यामुळे सध्या या सरपंचांना कोणत्या न कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर अडचणीत पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे दिसत आहे. केडगावचे सरपंच हे सुशिक्षित आणि राजकीय पार्श्वभूमीची जान असलेल्या परिवारातून असल्याने त्यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेताच भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवण्यास प्राधान्य दिले होते. त्यामुळे वर्षानुवर्षे मलई खाण्यास चटावलेले अनेक लाभार्थी दुखावले गेले असून आमचा विचार करा, नाहीतर अडचणींना सामोरे जा असाच काहीसा प्रकार येथे पहायला मिळत आहे.

काही जणांकडून विकास कामांच्या नावावर ग्रामपंचायतीचे वाभाडे काढले जात आहे. संपूर्ण जिल्ह्याला भेडसावणारा कचरा प्रश्न येथेही उभा आहे. केडगाव ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्यांची सोय केली असतानाही अनेक ग्रामस्थ मुद्दाम हा कचरा रस्त्याच्या कडेला, ओढ्याच्या शेजारी आणि मोठमोठ्या बिल्डिंगच्या बाजूला टाकत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य वाढत जाऊन दुर्गंधी पसरत आहे. ग्रामपंचायतीने नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही हा कचरा अश्या प्रकारे उघड्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढीस हातभार लागत आहे त्यामुळे हा कचरा गोळाकरून पुन्हा तो दुसऱ्या ठिकाणी घेऊनजताना ग्रामपंचायतीची डोके दुःखी मात्र वाढत आहे.

 राजकीय पोळी भाजण्याचा डाव
नुकतीच विधानसभा निवडणूक झाली असून या निवडणुकीत केडगावमधून विद्यमान आमदार राहुल कुल हे ६०० मतांच्या फरकाने पिछाडीवर राहिले आहेत हाच धागा पकडून आता विरोधकांसह कुल गटातीलही काहीजण सरपंचांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. केडगावमधील घटलेल्या मताधिक्याला सरपंचच जबाबदार असल्याचे भासवून हे घटलेले मताधिक्य सरपंचाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीजण सक्रिय झाले आहेत.

Visit : Policenama.com