जिल्हा क्रिडा संकुलनातील जलतरण तलावात तरुणाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देवपूर वाडिभोकर परिसरातील जिल्हा क्रिडा संकुलनात सकाळच्या सञातील पहिल्या बँचमधील एका तरुणाचा तलावात पोहताना मृत्यू झाला. ह्या वार्तामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या बाबत माहिती आशी की, जलतरण तलावात सकाळी पाच वाजेच्या दरम्यान पोहायला गेलेला तरुणांचा मृत्यू झाला. व्यंकटेश सातभाई हा तरुण जलतरण तलावातील पाण्यात पोहताना अचानकपणे त्याच्या तोंडातून फेस येताना दिसताच तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी पाण्यात चटकन उडी मारत व्यकंटेश सातभाई या तरुणाला पाण्यातून ओढून बाहेर काढले. त्याच्यावर तिथे असलेल्या डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार करण्यास सुरवात केली. उपचारा दरम्यानच तरुणाचा मृत्यू झाला. तपासणी करुन नंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले. या अगोदर जलतरण तलावात माजी महापौर मोहन नवले यांच्या नातूचा बूडुन मृत्यु झाला आहे. सदर घटने बाबत पश्चिम देवपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.