दिल्ली विधानसभा ! केजरीवालांना बसू शकतो मोठा धक्का, भाजपसोबत जाण्याची ‘या’ पक्षाची तीव्र ‘इच्छा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या तारखा समोर आल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. भाजप यावेळी दावा करत आहे की, यावेळी त्यांचा पक्ष दिल्लीची खुर्ची सांभाळणार आहे. तर काँग्रेसदेखील पुन्हा एकदा दिल्लीत सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

याच दरम्यान दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष(जेजेपी) हादेखील निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे. जेजेपीला वाटत आहे की, दिल्लीत ते 10 ते 13 जागा जिंकू शकतात. सध्या हरियाणामध्ये भाजप आणि जेजेपी युतीचं सरकार आहे.

जेजेपी घेईल भाजपचा सपोर्ट
हरियाणात भाजपसोबत सरकार स्थापन करणारा जेजेपी दिल्लीतही भाजपसोबत जाईल. परंतु भाजप दिल्लीत जेजेपीसाठी 10 ते 13 जागा सोडेल याची शक्यता कमी आहे. रिपोर्टनुसार, जेजेपी दिल्लीतल्या पालम विधानसभा, नजफगढ, महरौली, नांगलोई आदी 10 ते 13 जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे. पूर्वीपासून दिल्लीत भाजप एकटाच लढत आला आहे. जवळपास 22 वर्षांपासून दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री बनू शकलेला नाही.

…तर बिघडू शकतो खेळ
दिल्ली विधानसभेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी केजरीवाल यांना हरवण्याचा दावा करत आहेत. सध्या जे समीकरण केलं जात आहे त्यानुसार, जेजेपीसाठी जागा सोडणं अवघड दिसत आहे. आता दिल्लीत जेजेपी स्वबळावर लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु असे झाल्यास हरियाणातील भाजप आणि जेजेपी युतीचं सरकार अडचणीत येऊ शकतं. दोन्ही पक्ष वेगळे झाल्यास सरकार कोसळू शकतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like