धक्कादायक ! वहिनीवर दिराचा जीव ‘जडला’, ‘लगट’ केल्यानंतर तिनं केला ‘विरोध’, यानं केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील प्रेमनगर मध्ये एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत दिराने वाहिनीचा आणि तिच्या चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून केला. या प्रकरणात पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अल्पवयीन दिराने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यामध्ये अयशस्वी ठरला. मात्र त्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने त्याने आपल्या वाहिनीचा आणि चार वर्षाच्या पुतण्याची हत्या केली. आरोपी हा बिहारच्या मुजफ्फरपुरचा रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीत भाजीविक्री करत होता. त्याचबरोबर त्या पीडित कुटुंबाबरोबर राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना घरात आढळून आला.

महिलेचा गळा धारधार शस्राने कापून तिची हत्या करण्यात आली होती तर तिच्या मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान, तपासात पोलिसांना आढळून आले कि, घरात सर्वात शेवटी येणारा व्यक्ती हा अल्पवयीन मुलगाच होता. त्याचबरोबर पोलिसांना महिलेच्या मोबाईलमध्ये या मुलाबरोबर काढलेली सेल्फी देखील मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांना या मुलावर शंका बळावली आणि त्यांनी त्याला अटक केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like