उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष पदाची राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये ‘अदलाबदल’, ‘ही’ नावं चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काल सरकार स्थापन झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे, विधानसभा अध्यक्ष पद कोणाकडे याची चर्चा होती. आता वृत्त आहे की अजित पवारांना नाही तर बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

कालपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये धूसपूस दिसत होती. काँग्रेसकडून मागणी करण्यात येत होती की आम्हाला विधानसभा अध्यक्षपद हवे होते. परंतू त्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदाचा दावा करण्यात आला.

अखेर हा पेच सुटताना दिसत आहे. कारण दोघांमधील धूपसूप संपली आहे आणि राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्ष पद देण्यात येईल असे वृत्त आहे. तर उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देण्यात येणार आहे. सध्या हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भाजपचे कालिदास कोळंबकर यांना देण्यात आले होते. आता त्यांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे.

उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हे स्पष्ट झाले असले तरी विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतू या पदी दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज ते मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील.

विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदासाठी ही नावं चर्चेत

राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदाची अदलाबदल करण्याचे ठरल्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्ष कोण याबाबत चर्चेला सुरवात झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. यापुर्वी देखील दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आता उपमुख्यमंत्री पद हे काँग्रेसकडे देण्याचे ठरल्याने जवळपास बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री होतील असा अंदाज आहे.

Visit : Policenama.com