आमदार धनराज महाले यांची ‘घरवापसी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे मुंबईतील माजी आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का बसला, कारण सचिन अहिर यांचा नवी मुंबईच्या भागात मोठे वर्चस्व होते. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाला लागलेली हि गळती काही थांबायचं नाव घेत नाहीय कारण आता राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार धनराज महाले घड्याळ सोडून शिवधनुष्य हातात घेणार आहेत.

माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे वारसदार असलेल्या धनराज महाले यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. लोकसभेच्या निवडणुकी वेळी धनराज महाले आणि बीजेपीच्या डॉ. पवार यांच्यात चांगला संघर्ष पहायला मिळाला होता.

राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले महाले यांना लोकसभेत जाण्यासाठी त्या वेळी आजूबाजूच्या शिवसैनिकांनीच रोखले होते त्यामुळे डॉ. पवार यांचा विजय सुखकर झाला होता आणि महाले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुळात धनराज महाले हे शिवसैनिकचं मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्यामुळे लोकसभेसाठी महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादीतुन भाजपात गेलेल्या डॉ.पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता महाले पुन्हा सेनेत प्रवेश करणार आहेत. याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे कारण राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या डॉ.  पवार दिंडोरीमध्ये खासदार आहेत आणि आता दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीला नेतृत्वासाठी नवा चेहरा शोधावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –