धुळे : ब्रिटीश कालीन कॉजवे पुलावरील वाहतूक दोन दिवस बंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पांझरा नदीला आलेला महापूर आज (मंगळवार) ओसरला असून अक्कलपाडा धरणाचे १८ दरवाजे बंद करण्यात आले आहेत. अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पांझरा नदिला महापूर आला आहे. या महापुरात मुंग्या बुधा बिलकुळे (वय 56 रा. मांजरी ता. साक्री जि. धुळे) हे काल रात्री पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सतत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर आला असून या नदी वरील चार पुलावरून पाणी वाहत असल्याने हे पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. पाण्याच्या प्रवाहाने पुलावरील विद्युत पथदिवे, कठडे वाकून तुटून पूराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पांझरा नदी वरील कॉजवे पुलाचे मोठे नुकसान झाल्याने अजून दोन दिवस हा मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुपार पासून पांझरा नदी वरील गणपती मंदीर हा तिसरा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

पांझरा नदी वरील फरशी पूलावरील रस्ता खचल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाईपमध्ये अडकलेला पालापाचोळा, कचरा साफसफाईसाठी तातडीने दोन जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. पांझरा नदी पात्रात अडलेल्या पाण्याला वाट मोकळी करुन दिली जात आहे. पुराच्या पाण्यामुळे नदी काठी असलेल्या काही घरात पाणी शिरले होते. काही घराची पडझड झाली आहे. दुतर्फा असलेल्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तिसरा पुल व मोठा पुल, कुमारनगर, देवपूरातील एकविरा देवी मंदिर जवळील पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

तिसऱ्या पुलावरील पांझरा नदी पात्रात उभी केलेली महादेव मुर्ती पाण्याने वेढली असल्याने सध्या तो सेल्फी पॉईट झाल्याचे दिसत आहे. पुराचे पाण्यातही काही उत्साही तरुण सुर मारताना दिसून आले. हे अंत्यत धोके दायक असून अशा प्रकारचे धाडस जीवावर बेतू शकते. त्यामुळे तरुणांनी असे धाडस करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like