धुळे : ‘भाजपा हटवा आरक्षण वाचवा’, काॅंग्रेसचे धरणे आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरीत अनुसूचित जाती जमातीला आरक्षणाचा मुलभूत अधिकारी नाही, तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची नाही असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. उत्तराखंड सरकारचा हा दावा मान्य करत सुप्रीम कोर्टाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे राज्य सरकारवर बंधनकारक नाही असा निकाल दिला आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार असून मागासवर्गियांचे आरक्षण संपूष्टात आणण्याची सरकारची भूमिका आहे. यासाठी धुळे जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात ‘भाजपा हटवा आरक्षण वाचवा’ असे फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यात आला.