धुळे : महिला बस वाहकाची रोक्कड लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रवाशांचे तिकीटाचे पैसे महिला बस वाहनकाने शर्टच्या खिशात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील अंदाजे १५ हजार रुपांची रोकड चोरून नेली. हा प्रकार साक्री धुळे रोडवरील अरुणकुमार वैद्यनगर येथे रविवारी रात्री घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला वाहकाने फिर्य़ाद दिली आहे.

फिर्य़ादी या धुळे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्य़रत आहेत. काल रात्री शहदा धुळे या मुक्कामी बसवर त्या ड्युटीवर होत्या. रात्री बस धुळे बसस्थानकात आल्यानंतर त्या त्यांच्या घरी गेल्या. घरातील खुंटीला त्यांनी पैसे असलेला शर्ट अडकवून झोपी गेल्या. दरम्यान रात्री अचानक लाईट गेल्याने त्यांना जाग आली. लाईट आल्यानंतर त्यांना शर्टाच्या खिशातून पैसे चोरीला गेल्याचे समजले. तसेच घरातील मोबाईल देखील चोरट्यांनी चोरून नेले.

हा प्रकार त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितला. वडिलांनी मित्राच्या मोबाईलवरून शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनस्थळी याऊन पाहणी केली. त्यावेळी चोरट्यांनी आंधाराचा फायदा घेऊन काठीच्या सहाय्याने शर्टच्या खिशातील रक्कम काढून नेल्याचा अंदाज व्यक्ते केला. महिला वाहक यांनी दिलेल्या फिर्यादेवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.