महिलेच्या बचत खात्यातील पैसे लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरपुर गावात सरकारी नोकरी करणाऱ्या महिलेच्या अँक्सीस बँकेतील बचत खात्यातील ३९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने एटीएमद्वारे व्यवहार करून लंपास केले. शुक्रवारी दुपारी हा प्रकार समोर आला आहे.

मंगल विनायक पाटील (वय.47.रा. करवंद नाका प्लॉट नं.16.अ.ब. बालाजी नगर)

मंगल पाटील शिरपूर येथे नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी अज्ञात चोरट्यांने एटीएमच्या साह्याने त्यांच्या खात्यातील पैसे काढले. त्यांना दुपारी मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरट्याने त्यांच्या खात्यातून ३९, ५०० रुपये काढले. अज्ञाताने दोन वेळा रोख रक्कम काढून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्सटेबल जे. एस. पाटील करत आहे.