धुळे : हरियाली ग्रुपकडून पूरगस्तांना मदत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीमुळे कोल्हापुर शहर आठ ते दहा दिवस पाण्यात होते. पुरात काही जणांना जिव गमवावा लागला. परंतु अशा संकटातच माणुसच माणसाच्या मदतीला धावून आला.
माणसाने माणसा सम वागणे. ह्या पध्दतीने धुळ्यातील कुमार नगरातील बाहावलपुरी पंचायत भवन हरियाली परिसर हमारा ग्रुप, गो ग्रीन ग्रुप वतीने समाज बांधवाना कोल्हापुर पुरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले.

समाजातील प्रत्येक घरातुन संसार उपयोगी साहित्य जमा करुन ते पँकिंग करुन एक आयशर ट्रक मध्ये भरुन आज हा ट्रक दुपारी कोल्हापुरकडे रवाना झाला.

मदत गोळा करण्यासाठी हरियाली ग्रुप मधील डॉ. रवि लालका, शैलेश लुल्ला, राजेश गुंडियाल, मनोज रेलन, अशिष मंदान, नितीन वधवा, रवी भगत, रौशन रेलन, अभिषेक रेलन, जुगल मंदान, मोहित वधवा, पियुष आहुजा, यश रेलन, अशिष रेलन ह्या सगळ्यांनी परिश्रम घेतले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like