धुळे : कत्तलखाण्यात घेऊनजाणाऱ्या जनावरांची सुटका

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महामार्गावरुन अवैध रित्या जनावरे कत्तलखान्यात घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडेल. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोलापूर-सुरत महामार्गावर बोरविहीर फाट्याजवळील सार्वजनीक रस्त्यावर शुक्रवारी रात्री करण्यात आली.

काल रात्री तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना माहिती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहनामध्ये जनावरे कोंबून ती महामार्गाने कत्तलखाण्याकडे नेण्यात येत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार दिलीप गागुर्डे यांनी एक पथक तयार करुन सोलापूर सूरत महामार्गावर गस्तीसाठी पाठविले. पथक गस्त घालत असताना त्यांना धुळे चाळिसगाव रोड वरील बोरविहिर फाट्याजवळ रस्त्यावर सार्वजनिक बोलेरो पिकअप वाहन त्यात दोन जण बसून असलेले संशयास्पद आढळले.

पथकातील पोलीस कर्मचारी यांनी गाडी चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीची झडती घेतली असता पाच गायी आढळून आल्या. गाईविषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गाई औरंबादकडे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन पाच गायींना उपचारासाठी चाळिसगाव रोड जवळील गो शाळेत सोडण्यात आले.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल दयाराम शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे. तर महम्मदअली मकसुदअली सैय्यद (रा.आझाद नगर धुळे) आणि अब्दुल टकल्या या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत १ लाख रुपयांचा पिकअप आणी ४० हजाराच्या गायी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’