मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीरास प्रारंभ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि आई जगदंबा हेल्थ केअर सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीरास आज (शनिवारी) प्रारंभ झाला.

आई जगदंबा हेल्थ केअर सेंटरचे विख्यात मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजर संजय कुलकर्णी काका यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबीराचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मीनाक्षी पंडित तसेच ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिलजी रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. उदघाटनापूर्वी दगडूशेठ मंदिरात श्री. कुलकर्णी काका यांच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली.

Advt.

दगडूशेठ गणपती मंदिरामागील गणेश सदन येथे दिनांक १० फेब्रुवारीपर्यंत हे शिबीर चालणार असून त्याची वेळ दुपारी दोन ते रात्री साडेआठ अशी आहे. दररोज पाचशे रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार केले जाणार असून स्त्री आणि पुरुषांसाठी तपासणीची व्यवस्था स्वतंत्ररित्या करण्यात आली आहे. डी.वाय. पाटील कॉलेजचे २५ डॉक्टरांचे पथक सहाय्यासाठी आहे.