राजकीय व्देषापोटी मला अडकावण्यासाठी षडयंत्र : माजी आमदार दिलीप मोहिते

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणूकीत विरोधकांना पराभव दिसू लागला आहे. विधानसभेची निवडणूक एकतर्फी करण्यासाठी मला या प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. चाकण दंगल प्रकरणात खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिलीप मोहिते पुढे म्हणाले, मराठा हितासाठी दंगल करणे हे आपल्याला पटत नाही. मराठा समाजासाठी आम्ही शांततेत मोर्चा काढला. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. महामार्गावर मोर्चा आला त्यावेळी पोलिसांनी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही. याचा फायदा समाजकंठकांनी घेतला. पोलिसांना समाजकंठकांना आवराव असे आवाहन पोलिसांना केले होते. त्यानंतर समाजकंठांनी जो गोंधळ घातला त्याचा आमचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.

माझ्या भाषणानंतर दंगल उसळली असल्याचे पोलीस सांगत आहे. माझ्याकडे भाषणा आगोदरचे देखील पुरावे आहेत. याठिकाणी सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणे झाले. मग त्यांची भाषणे प्रक्षोभक नव्हती का ? असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला. राजकीय द्वेषापोटी मला अडवण्या करीता हे षडयंत्र रचलं असल्याचे सांगून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मला का अटक केली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

दोन महिन्यावर विधानसभा निवडणूका आल्या असून या प्रकणात मला अडकवायचे, मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणूक एकतर्फी करायचा घाट घातला जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांना लीड मिळाला आणि ते निवडून आले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी मला कोणत्यातरी प्रकरणात अडकवायचे ठरवले असल्याचा आरोप दिलीप मोहितेंनी केला आहे.

दहा महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेत शासन आत्ता नवीन गुन्हे दाखल करत आहे. शासनाला नेमके काय सिद्ध करायचे आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली असून समितीने काम सुरु केले आहे. १३ हजार ७०० पैकी काही गुन्हे माघारी घेण्यात आले असून काही गुन्हे मागे घेण्याचे काम सुरु आहे. राज्य शासन नव्याने अटक सत्र सुरु करून मराठा तरुणांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाने हे थांबवावे आणि जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करावी. चाकण सध्या शांत झाले आहे. राजकीय मतभेत बाजूला ठेवून चाकणमध्ये जो प्रकार सुरु आहे तो तात्काळ थांबवावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दंगलीनंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये दिलीप मोहितेचे नाव नव्हते. आता नव्याने एफआयआर दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये त्यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलीस अधिकारी याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ‘हे’ ५ घरगुती उपाय, जाणून घ्या

Loading...
You might also like