दौंडमधील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 16,527 रुग्णांची तपासणी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – (अब्बास शेख) – कै.सुभाषआण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “महाआरोग्य शिबीर २०२०” चे उद्घाटन आमदार राहुल कुल यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी दौंड तालुक्यातील रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मी लोकप्रतिनिधी या नात्याने कटीबद्ध आहे असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना कुल म्हणाले कि, सध्याच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, आज घेण्यात आलेले आरोग्य शिबिर हे फक्त निमित्त असून पुढील शिबिरापर्यंत संपूर्ण वर्षभर नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या शिबिरामध्ये सुमारे १६५२७ रुग्णांची वेगवेगळ्या आजारांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये पुणे व परिसरातील सुमारे ४० हून अधिक नामांकित रुग्णालयांनी सहभाग नोंदवला आहे. १० लक्ष रुपयांची औषधे मोफत वाटप,तसेच १० लक्ष रुपये किमतीचे अपंग साहित्य, सुमारे ३५०० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप, ५००० नागरिकांनी रक्ताची तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्र्क्रिया, महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी, उपलब्धते नुसार श्रवण यंत्रे आदी अनेक सुविधा या शिबिराच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या. ५० रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शिबीरस्थळावरून पाठविण्यात आले आहे तर ६०० पेशंटची एम.आर. आय., १०० अंजियोग्राफी, ७६ मणका ऑपरेशन, १०० कॅन्सर रुग्ण आदींची तपसणी पुढील काळात करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, धर्मादाय संलग्न रुग्णालये, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग,महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना,दौंड शहर व तालुका मेडिकल असोसिएशन, दौंड शहर व तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, निमा दौंड, भीमथडी शिक्षण संस्था, रोटरी क्लब ऑफ दौंड, नेताजी शिक्षण संस्था – सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव यांचे सहकार्य या शिबिरामध्ये लाभले.

प्रसंगी माजी आमदार रंजनाताई कुल, कांचन ताई कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मा. शीतलताई कटारिया, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष मा. गणेश आखाडे, राहुल शेवाळे, मा. राजाभाऊ तांबे, धनजीभाई शेळके, महेश भागवत, वासुदेव काळे,
अप्पासो हंडाळ, किरण देशमुख, हरीश खोमणे, दादासाहेब केसकर, शिवाजी दिवेकर, हरिभाऊ ठोंबरे, गोरख दिवेकर, कैलास गुरव, बाळासाहेब तोंडे, माऊली ताकवणे, दौंड तालुका मेडिकल असो. आणि केमिस्ट असो. विविध संस्थाचे खाजगी डॉक्टर्स, पदाधिकारी यांचेसह परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like