डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ ३ महिला डॉक्टरांना पोलीस कोठडी

मुंबई : वृत्तसंस्था – डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवालला या डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. आज या तिन्ही आरोपींना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटक ३ डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
डॉ. पायल तडवी यांनी तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणा-या रॅगिंगला कंटाळून २२ मेला गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केली होती. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन महिला डॉक्टरांविरुध्द ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार या तीन डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.