केंद्र सरकारचा मोठा निर्णय : ८ वी पेक्षा कमी शिकलेल्यांना देखील मिळणार ‘DL’, २२ लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यांनतर अनेक वेगवेगळे निर्णय घेत आहे. यातीलच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आज झालेला वाहन परवान्या संदर्भातचा निर्णय होय. ड्रायविंग लायसेन्स साठीचा ८ वी पास अनिवार्य असण्याचा नियम आता शिथिल केला आहे. यामुळे आता शिक्षणामुळे वाहतूक क्षेत्रातला रोजगार थांबणार नाही. केंद्रीय वाहतूक आणि बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी यासंदर्भात निर्णय घेत २२ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कारण सध्या वाहतूक क्षेत्रात २२ लाख वाहनचालकांची कमतरता भासत आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार हि कमतरता दूर करण्यासाठी देशात एकूण २ लाख स्किल सेंटर उघडण्यात येतील.

वाहन परवान्यासाठी आता शिक्षणापेक्षा प्रशिक्षण आणि कौशल्यावर आधारित परीक्षेवर अधिक भर दिला आहे जेणेकरून रस्तासुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. आत्तापर्यंतच्या केंद्रीय मोटर वाहन नियमावली, १९८९ च्या नियम ८ नुसार वाहन चालक परवाना मिळविण्यासाठी ८ वी पास असणे आवश्यक आहे. आता हा नियम बदल्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याचे आदेश मंत्रालयातून दिलेले आहेत आणि लवकरच या संदर्भात अधिसूचना काढली जाईल.

देशात २०१८-१९ या वित्तीय वर्षात नवीन १०,०७,३१९ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली याशिवाय ३३,७७,४३६ प्रवासी वाहने तर २१,१८१,३९० थ्री व्हीलर वाहनांची विक्री झालेली आहे.

काय म्हणले नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री गडकरींनी आपल्या ट्विट मध्ये म्हटल्यानुसार, “समाजातील कमी शिकलेले आणि गरीब असणारे अनेक लोक वाहनचालकाच्या नोकरीच्या शोधात आहेत. असे असताना आता मात्र शिक्षणामुळे वाहतूक क्षेत्रातला रोजगार थांबणार नाही, कारण ड्रायविंग लायसेन्स मिळवण्यासाठी आता ८ वी पास पर्यंत शिक्षण असणे आता अनिवार्य असणार नाही. ड्रायविंग टेस्‍ट पास केल्यास वाहन परवाना दिला जाईल. ड्रायविंग च्या ट्रेनिंग साठी देशात २ लाख नवीन स्किल सेंटर उघडण्यात येणार आहेत. या क्षेत्रात २२ लाख पेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत.”

याचे कारण देताना मंत्रालयाने सांगितले कि मंत्रालयाने बस, ट्रक आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी ८ वी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. याची गरज आहे कारण देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक असे आहेत जे जरी शिक्षित नसले तरीही कुशल आणि साक्षर आहेत.

आरोग्यविषयक बातम्या
‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
दम्याने त्रस्त असाल तर “घ्या” ही काळजी 
पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम