१५ शहीद जवानांच्या मृत्युस जबाबदार उपाधीक्षकास फाशी देण्याची मागणी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. त्यासाठी तेथील उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेष काळे यांना जबाबदार धरुन त्यांच्या निलंबनाची घोषणा केली असली तरी काळेला केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्याला फाशीची शिक्षाच द्यावी, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शहीद जवानाच्या मातेने केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १ मे रोजी झालेल्या नक्षली हल्ल्यात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याच्या तरोडा येथील आग्रमन बक्षी रहाटे या जवानाचा समावेश होता.
तरोडातील शहीद जवान आग्रमन रहाटे यांची आई निर्मला यांनी सांगितले की, शैलेष काळेमुळे आग्रमनसह अनेक जवानांचा नाहक बळी गेला. या काळेवर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, केवळ निलंबन करून भागणार नाही तर भाऊ आशिष यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्यासाठी अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. निर्मला रहाटे यांनी काळे यांच्याविरोधात तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त केला.

भविष्यात अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कुण्या गरिबाचा बळी जाऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अशा हल्ल्यात मंत्री, अधिकाऱ्यांची मुले का शहीद होत नाही, गरिबांच्याच मुलाचा का जीव घेतला जातो, असा सवालही शहीद आग्रमन रहाटे यांच्या आईने उपस्थित केला.

आरोग्य विषयक वृत्त-

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा